निमंत्रणाविना कशी पहाटही उजाडली
संगतीने आज माझ्या रात्र नाही जागली
का कुणाच्या सांगण्याने थांबते उगवायचे
ना कुणाच्या सांगण्याने रात्र आहे लांबली
एवढ्यासाठीच का मी जाळले होते दिवे
काजव्यांना हि स्वतःची लाज नाही वाटली
या तमाच्या साक्षीने तल्लीन व्हावे रंगुनी
अद्यापही नयनी अशी स्वप्ने जुनी रेंगाळली