Pages

Thursday, 29 September 2011

चाहूल


दिसले अनेक चेहरे
जणू आरसेच सारे
प्रतिबिंब पाहताना
जखमा शहारल्या

कोणा कशी कळेना
चाहूल लागली
बागेतल्या फुलांनी
मानाच टाकल्या

सांगूनही कुणाचा
विश्वास का बसेना
माझाच आज मजवर
संशय बळावला

भिंती जुन्या-पुराण्या
कारागृहात इथल्या
झुळूका स्वतंत्रतेच्या
येथे न वाहिल्या

पिंजरा पहा जगाचा
करतो कसा भुलावा
कोंडून घ्यावयाला
स्पर्धाच लागल्या


पाउलखुणा स्वरांच्या
उरल्या हवेत काही
झंकारल्या कितेक
तारा मनातल्या


कोलाहालास त्यांच्या
नाही अजून जाग
स्वर ध्यान-मग्नतेचा
त्यांनी न ऐकिला

दृष्टीसमोर केवळ
उरली आता निळाई
सगळ्या दिशा धुक्याने
केव्हाच वेढल्या

विझवू नका कुणीही
ज्योती निरांजनाच्या
आता कुठे मनाच्या
वाटा प्रकाशल्या

No comments:

Post a Comment