Pages

Friday, 30 September 2011

पहाट


निमंत्रणाविना कशी पहाटही उजाडली
संगतीने आज माझ्या रात्र नाही जागली

का कुणाच्या सांगण्याने थांबते उगवायचे
ना कुणाच्या सांगण्याने रात्र आहे लांबली

एवढ्यासाठीच का मी जाळले होते दिवे
काजव्यांना हि स्वतःची लाज नाही वाटली

या तमाच्या साक्षीने तल्लीन  व्हावे रंगुनी
अद्यापही नयनी अशी स्वप्ने जुनी रेंगाळली

No comments:

Post a Comment