Pages

Thursday, 6 October 2011

निशिगंध


वाट पाहत थांबले
डोळे तुझ्या वाटेवरी
स्वप्नातही दिसते न आतां
चांदणे निजल्यावरी

झन्कारालेली तार माझी
छेडीता तू स्पर्शूनी
रोमांच-भरले  नाद-मोहर
बहरले वीणेवरी

मारलेली हाक जी
परतून ना आली कधी
प्रत्येक हाकेचे दिसे
पाउल उंबरठ्यावरी

पाखराने वळचणीचा
आसरा का शोधला
आकाश चिंताक्रांत अन
दाही दिशा मागावरी

शेंदूर देठाचा कसा
प्राजक्त गेला फासूनी
पाऊल अलगद सांडता
मृद्गंध-लुब्ध सड्यावरी

निशिगंध आहे त्याच जागी
लाविला होता जिथे
निरोप आले अत्तराचे
वाहत्या वाऱ्यावरी

No comments:

Post a Comment