पायवाटेच्या दिशेने
चालती सारे
पाय वळती ज्या दिशेला
वाट ती माझी
राजरस्ते ना कधीही
पाहिले आम्ही
वाट अमुची एकटी अन
एकाटासा मी
चालताना भान नव्हते
चाललो कोठे
चांदणे न्याहाळताना
वाट चुकलो मी
खूप काही दाविले
नवख्याच वाटेने
वाट चुकलेली तरीही
मी समाधानी
वाहणाऱ्या निर्झराशी
बोललो होतो
थांबलो ऐकून
त्याचे बोल सोनेरी
वाहत्या पाण्यात अक्षर
कोरले होते
चोरले पाण्यामधुनि
शब्द काही मी
सुचविली यमके
जराशी याच वाऱ्याने
मी नव्हे हो त्यातला
चोर नवखा मी
सोडतो पाण्यात
करूनी नाव शब्दांची
पाहुया नेते कुठे
भटका मुसाफिर मी
No comments:
Post a Comment