Pages

Monday, 13 July 2015

तुझे पाऊल सोनेरी


तुझे पाऊल सोनेरी 
उमटले माझिया दारी 
सुगंधी आज गाभारा 
तुझा आजन्म आभारी 

सडा पडलाय आवारी 
उभा प्राजक्त शेजारी 
भरोनि घे तुझी ओंजळ 
पुन्हा परतून माघारी 

No comments:

Post a Comment