Pages

Sunday, 1 December 2013

कितेक

दिसले फुलाफुलांचे असले थवे कितेक
गर्दीत ताटव्यांच्या मिटल्या कळ्या  कितेक

केलेत  वार ज्यांनी करूया सजा अशांना
त्यांच्या जुन्या गुन्ह्यांच्या पटल्या खुणा कितेक

जपल्या अनेक वर्षे निजवून पुस्तकात
हलक्या पिसाप्रमाणे या पाकळ्या कितेक

घुमती दिशाही दाही ज्यांच्या प्रतिध्वनींनी
उठती उधाणराती लाटा अशा कितेक

निःशब्द शांततेच्या उदरात जलसमाधी
घेतात वर्तुळे जी वलये अशी कितेक

वाटेकडेच डोळे बसली अजून लावून
डोळ्यांपलाड लपली स्वप्ने अशी कितेक