Pages

Saturday, 28 June 2014

षड्ज-गंध


अंतरीच्या  नाद्ब्रह्माला  निनादू  दे 
चैतन्यमय झंकार गाभाऱ्यात नांदू दे 

लाव उदबत्त्या नव्याने  षड्ज-गंधाच्या 
घमघमाटाने तुझा अंगांग बहरू दे 

गोंगाट अन कोलाहलाच्या खोलवर तळाशी 
अगदी मुळाशी जाणीवेची ज्योत जागू दे 

नेणिवेच्या पायवाटेवर सडा पडला
कण प्रकाशाचे पुन्हा वेचून घेऊ दे