Pages

Thursday, 6 December 2012

काजवा


श्वास घेताना तिने उच्छ्वास उष्टा चाखला 
डोळ्यांतुनि  डोकावणारा शब्द नाही वाचला 

आहे पुरावा झिंगल्याचा, आकंठ बुडल्याचासुद्धा 
चेहरा पहा आरक्त माझा, रंग नाही माखला 

आकाश व्यापलेले ढगांनी-सूर्य-आहे झाकला 
सांज-किरणांनी कधीचा राजीनामा टाकला 

रात्रभर मग चांदण्याच्या आमिषाने जागला
काजवा धुंदीत अपुल्या सावलीसह  नाचला