Pages

Tuesday, 27 December 2011

गझल

ऐकताना गाझ लाटांची मला दिसली गझल
मी मला दिसलोच नाही, फक्त दिसली ती गझल

गर्दीमध्ये हरवले तळहात ते भुकेले
धनवंत पाकीटांच्या  कैदेमध्ये गझल

खिडकीतूनी  गजांच्या चतकोर चांदण्याचे
डोकावले कवडसे, ती कौमुदी- गझल

वळता पुन्हा कुशीवर, भिजली उशी जराशी
मस्तीत सांडली मग डोळ्यांतुनी गझल

रंध्रात पेरताना स्वर बासरीमधुनि 
श्वासांतल्या फटीतून डोकावली गझल