Pages

Tuesday, 8 November 2011

पहाट-वारा

वारा पहाटेचा 
अंगणात परतून आला 
भिरभिरत-फिरत
पाला-पाचोळा उडाला

पाना-पानातून झिरपून
चंद्र ओघळला 
दवबिंदू होऊनिया 
काच-मोती पाझरला

कुठे रानात-वनात 
हाक येई पाखराची
फांदीवर निजलेला 
कवडसा जागा झाला

आता उजाडेल पहा 
पहा, तो पहा तिथेच 
मऊ ढगांच्या उशीत 
सूर्य आळसावलेला


घेऊ निरोप निशेचा 
जिने अंधार दाविला 
म्हणूनच दिस आज
मनापासून भावला